देवळालीतून शिर्डीला निघाली साई पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:50 PM2018-12-26T23:50:31+5:302018-12-26T23:50:57+5:30
विजयनगर येथील ओमसाई राम सेवाभावी संस्थेच्या वतीने भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पादूका पालखी पदयात्रा उत्साहात रवाना झाली.
देवळाली कॅम्प : विजयनगर येथील ओमसाई राम सेवाभावी संस्थेच्या वतीने भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पादूका पालखी पदयात्रा उत्साहात रवाना झाली. श्री साईराम सेवाभावी संस्थेचे संस्थापक तानाजी भोर व उषा भोर यांच्या हस्ते सोमवारी सकाळी श्री रेणुका माता मंदिरात महाआरती करण्यात आली. दिनेश गोविल, संजय आडके, गोरख गाढवे, संजय काळे, अनिकेत भोर, सागर वाजे, विलास गुरूळे, कैलास आडके, चेतन गुरव, प्रफुल्ल गुरव, उमेश चौधरी आदींच्या हस्ते पदयात्रेत जाणाऱ्या साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई पालखी व पादुकांची पूजा केल्यानंतर श्री साईबाबांचा जयघोष करत भाविक पालखी घेऊन शिर्डीकडे रवाना झाले.
पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गजानन महाराज मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती संपन्न होऊन पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली. पालखी शिर्डीहून परतल्यावर गुरुवारी ३ जानेवारीला विजयनगर येथे आल्यानंतर सायंकाळी ६ वाजता संतांची थोरवी हा सांस्कृतिक कार्यक्रम व महाआरती होणार आहे.