सायने शिवारात म्हशीला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:27+5:302021-09-16T04:19:27+5:30
सोयगाव (सचिन देशमुख) : मालेगाव येथील चाळीसगाव चौफुलीपासून पाच किमी अंतरावर छोटे सायने येथील शेतकऱ्याची म्हैस रस्ता ओलांडत असताना ...
सोयगाव (सचिन देशमुख) : मालेगाव येथील चाळीसगाव चौफुलीपासून पाच किमी अंतरावर छोटे सायने येथील शेतकऱ्याची म्हैस रस्ता ओलांडत असताना भरधाव चाललेल्या ट्रकचालकाने म्हशीला उडविल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
चाळीसगाव फाट्यावरून मुंबई आग्रा महामार्ग आहे. महामार्गालगत अनेक लहानमोठे खेडे असून, येथील शेतकरी गुरेढोरे म्हशी चारण्यासाठी शेताच्या आजूबाजूला नेत असतात. सध्या पावसामुळे हिरवळ असल्याने गुरेढोरांना चरण्यासाठी भरपूर गवत असल्याने शेतकऱ्यांना सध्या चारापाण्याची चिंता नाही मात्र महामार्गावर जनावरे गेल्यास अवजड वाहनाखाली जाऊन जीव जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सायने फाट्याच्या पुढे हॉटेल एकताजवळ ट्रकचालकाने म्हशीला उडविले. पळून जाण्याचा बेतात म्हशीला अर्धा किमी ट्रकखाली घसरत नेत असल्याचे मागून येत असलेले चिखलओहोळ येथील माध्यमिक शिक्षकाने बघितले त्यांनी त्याचा दुचाकीवर पाठलाग केला. समोर पाऊस चालू असल्याने काही दुचाकीस्वार झाडाखाली उभे होते. त्यांना आवाज देत समोर येत अडलेल्या वाहनचालकाला रोखण्यास सांगितले. मागून म्हशीचा मालक पळत येत होता. ट्रकखाली चिरडलेली म्हैस बघून त्यास रडू कोसळले. दुधावर उपजीविका असल्याने त्यास मनात धस झाले. जमलेल्या लोकांनी शेतकऱ्यास धीर देत ट्रकचालकाला चोप देत म्हशीचा खर्च भरून देण्यास सांगितले असता त्याने ट्रकमालकाशी बोलून खर्च देण्यास होकार दिला असता शेतकऱ्यास थोडा दिलासा मिळाला असला तरी दुभते जनावर गेल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.