सिन्नरला घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 02:37 PM2018-12-08T14:37:42+5:302018-12-08T14:38:02+5:30
सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करुन मध्यप्रदेशात जावून मुद्देमाल विकणा-या परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करुन मध्यप्रदेशात जावून मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तीन दिवस मध्यप्रदेशात तळ ठोकून पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशात पथक पाठविले होते. धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात सिंगाचोरी गावात सदर गुन्हेगार वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतरपथकाने सापळा रचला. यातील संशयीत ठाकूर ऊर्फ कालू हारु मंण्डलोई (२३) व करमसिंग कालू भुरीया (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगण्यासह सिन्नर शहर, शिवाजीनगर, सरदवाडीरोड, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन या सहा ठिकाणी बंद घरांवर पाळत ठेवून चोºया केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीश आडसुळ, हवालदार दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, प्रितम लोखंडे, नीलेश कातकाडे, किरण काकड, हेमंत गिलबिले, संदीप लगड, प्रदीप बहीरम यांनी कामगिरी केली. अटक करण्यात आलेले आरोपी साथीदारांसह पाळत ठेवून कडीकोयंडा तोडून घरफोड्या करीत. घरफोड्या केल्यानंतर शिर्डी गाठून एम. पी. पासिंगच्या वाहनांना हात देवून ते धार जिल्ह्यात पळून जात होते. गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल मध्यप्रदेश राज्यातील आलीया राजपूर जिल्ह्यातील बोरी येथील व्यापाºयास विक्री करीत होते. त्यानंतर आलेले पैसे वाटून घेत होते.