सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: November 5, 2016 01:44 AM2016-11-05T01:44:49+5:302016-11-05T02:08:33+5:30

सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

Sainate criminal pagarera bail application rejected | सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

सराईत गुन्हेगार पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

Next

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील अल्पवयीन मुलगी अत्याचार घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात उसळलेल्या दंगलीतील संशयित व सराईत गुन्हेगार तथा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ‍े) चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी शुक्रवारी (दि़४) फेटाळला़, तर याच प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला भाजपा नगरसेवक पवन पवारच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि़९) सुनावणी होणार आहे़
तळेगाव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना ८ आॅक्टोबर २०१६ रोजी घडली होती़ या घटनेनंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर या तालुक्यांमध्ये दंगल होऊन वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या़ या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते़ ११ आॅक्टोबर २०१६ अर्थात दसऱ्याच्या दिवशी सराईत गुन्हेगार व रिपाइं शहराध्यक्ष अर्जुन पगारे व शांताराम बागुल हे १०० ते १५० दुचाकींवर २०० ते २५० कार्यकर्ते घेऊन एका समाजाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत हातात लाठ्या-काठ्या, लोखंडी गज, पाइप घेऊन तळेगावला रॅली घेऊन गेले होते़ तुपादेवी फाट्यावर पगारे व एका समाजाने एकमेकांवर दगडफेक केल्याने दंगल झाली होती़ या प्रकरणी पगारेविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण, सरकारी कामात अडथळा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
तळेगाव घटनेपासून फरार असलेल्या पगारे याने न्यायाधीश भोस यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ या अर्जावर शुक्रवारी झालेल्या युक्तिवादात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व पोलीस निरीक्षक तथा या गुन्ह्याचे तपासी अंमलदार मुकुंद देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद केला़ यानंतर न्यायाधीश भोस यांनी अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला़ दरम्यान, याच दिवशी नाशिकरोड परिसरात पोलीस संचलनानंतर जेलरोड परिसरात दगडफेकीची घटना घडली होती़
पोलीस अधिकाऱ्यांवर चाकूहल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा भाजपाने प्रवेश देऊन पावन करून घेतलेला अपक्ष नगरसेवक तथा सराईत गुन्हेगार पवन पवार यास अटक केली होती़ यानंतर त्याच्या घराच्या झडतीत दोन कट्टे, काडतुसे तसेच हत्यारे सापडली होती़ त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: Sainate criminal pagarera bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.