साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:15 AM2018-07-31T01:15:22+5:302018-07-31T01:15:49+5:30

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.

Sainathnagar Chauflu jogging track parking? | साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ ?

साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅक की वाहनतळ ?

Next

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शहर वाहतुकीचे सहायक पोलीस उपायुक्त डॉ. देवरे यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. साईनाथनगर चौफुली ते डीजीपीनगर क्र मांक एकपर्यंत जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. आरोग्यासाठी चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने साईनाथनगर ते डीजीपीनगर यासह परिसरातील युवक-युवती आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर नेहमीच वर्दळ असते. परंतु साईनाथनगर चौफुलीलगतच आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने त्याठिकाणी जिल्ह्यातून विविध शहरांतून व गावातून परीक्षेसाठी विद्यार्थी वर्ग येतात. त्यातील बहुतेक विद्यार्थी सर्रासपणे जॉगिंग ट्रॅकमध्येच चारचाकी आणि दुचाकी लावतात त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. तसेच फेरफटका मारण्यास येणाऱ्या आबालवृद्धांनाही या अनधिकृत वाहनतळाचा त्रास होत आहे. तसेच काही वाहनधारक रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा होऊन नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. मोठी दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रमीज पठाण यांनी दिली आहे.
रस्त्यावर वाहने उभी केल्याने अडथळा
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर कृष्णाईनगरसमोर महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावरच दुचाकी वाहने लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, कृष्णाईनगर, सराफनगर, शरयूनगर, समर्थनगर आधी उपनगरे आहेत. या रस्त्यांवरच प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. अशातच कृष्णाईनगर समोर विद्यार्थी रस्त्यावरच दुचाकी लावत आहेत. सुमारे दीडशे ते दोनशे दुचाकी रस्त्यावरच उभ्या राहात असल्याने वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात वाहने उभी करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी शहर वाहतूक पोलिसांकडे नागरिकांनी केली आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष
रस्त्यावर असलेल्या एका महाविद्यालयाने त्यांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वाहने उभी करण्यास मज्जाव केला असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर आपली वाहने उभी करतात. त्यामुळे महाविद्यालयाने रस्त्यावरील वाहने आवारात उभी करावी, असे पत्र इंदिरानगर पोलीस ठाण्याने देऊनही त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

Web Title: Sainathnagar Chauflu jogging track parking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.