साईनाथनगर जॉगिंग ट्रॅकलगत भूमिगत गटारीचे चेंबर उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:42 PM2019-03-23T23:42:37+5:302019-03-24T00:17:19+5:30

साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली जॉगिंग ट्रॅकदरम्यान भूमिगत गटारीचे चेंबर उघडे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 Sainathnagar Jogging tracklocked underground sewage chamber open | साईनाथनगर जॉगिंग ट्रॅकलगत भूमिगत गटारीचे चेंबर उघडे

साईनाथनगर जॉगिंग ट्रॅकलगत भूमिगत गटारीचे चेंबर उघडे

googlenewsNext

नाशिक : साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली जॉगिंग ट्रॅकदरम्यान भूमिगत गटारीचे चेंबर उघडे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्ता ते वडाळागाव चौफुलीदरम्यान पाण्याच्या पाटात काही नागरिक केर-कचरा आणि शौचासाठी वापर करीत असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली अशा दोन टप्प्यात जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. जॉगिंग ट्रॅकलगतच निलगिरी वृक्ष असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. इंदिरानगर, साईनाथनगर यांसह परिसरातील सकाळ व सायंकाळी मोठ्या संख्येने आबालवृद्ध फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक नागरिकांच्या वर्दळीने फुललेला असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुलीदरम्यान असलेल्या भूमिगत गटारीचे सुमारे दहा ते बारा चेंबर उघडे आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागते तसेच घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला संबंधित विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भूमिगत गटारीच्या उघड्या चेंबरमुळे घाण व दुर्गंधीमुळे सकाळी व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर शुद्ध हवा व फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकाºया आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्र ार करूनसुद्धा दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत दखल घेऊन कारवाई करावी.
- रमीज पठाण,  नागरिक

Web Title:  Sainathnagar Jogging tracklocked underground sewage chamber open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.