साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:27 AM2019-01-13T00:27:46+5:302019-01-13T00:28:08+5:30

साईनाथनगर चौफुलीलगत आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने तेथे येणारे विद्यार्थी आणि पालक सर्रास रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

Sainathnagar road traffic congestion on the four roads | साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

साईनाथनगर चौफुलीलगत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

Next
ठळक मुद्देआॅनलाइन परीक्षा केंद्र : सर्रास वाहने उभी

इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने तेथे येणारे विद्यार्थी आणि पालक सर्रास रस्त्यावर वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
गेल्या पाच दिवसांपासून आय.आय.टी., अभियंता व मेडिकलसाठी प्रवेशासाठी पूर्वपरीक्षा या आॅनलाइन केंद्रावर सुरू होती. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या दुचाकी व चारचाकी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्याने सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
आॅनलाइन परीक्षा केंद्र असल्याने त्यासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुमारे ९०० विद्यार्थी परीक्षा आले आहेत. बारावी सायन्सचे विद्यार्थी परीक्षा देत असून, सकाळी साडेसात ते साडेबारा आणि दुपारी अडीच ते साडेपाच अशा दोन टप्प्यात परीक्षा होती.
परिसरातील नागरिक त्रस्त
सदर आॅनलाइन परीक्षा केंद्रात कायम परीक्षा सुरू असल्याने तेथे विविध शहरांतून आणि गावावरून येणारे विद्यार्थी व पालक वर्गांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यासाठी वाहन तळाची सोय नसल्याने सर्रासपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी या रस्त्याचे सूत्र बनले आहे. शहर वाहतूक पोलिसांना फक्त हेल्मेटसक्ती करून सर्वसामान्यांना त्रास देणे जमते रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. सदर आॅनलाइन परीक्षा केंद्रावर दररोज परीक्षा असल्याने वाहने रस्त्यावर तासन तास उभे असतात त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

Web Title: Sainathnagar road traffic congestion on the four roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.