पांगरी येथील संत हरिबाबा यात्रोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:38 PM2018-12-27T18:38:30+5:302018-12-27T18:38:52+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे ग्रामदैवत संत हरीबाबा यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे ग्रामदैवत संत हरीबाबा यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत पहिल्या दिवशी सांगवी येथून गोदावरी नदीपात्रातून भाविकांनी आणलेल्या गंगाजालाच्या कावडीची तसेच संत हरीबाबा यांच्या प्रतिमेची रथातून व पालखीची सवाद्य गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आमदार राजाभाऊ वाजे व शिवसेना युवानेते उदय सांगळे यांच्या हस्ते मूर्तीस जलाभिषेक व पूजन करण्यात आले. धार्मिक कार्यक्र मात सकाळी ४ ते ६ काकडा, ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण तर मनोरंजक कार्यक्रमांमध्ये रात्री ८ वाजता शोभेची दारूची आतषबाजी करण्यात आली. यात्रानिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
यात्रेच्या दुसºया दिवशी दुपारी दोन वाजेपासून कुस्त्यांची दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येवला, सिन्नर, संगमनेर, नाशिक, कोल्हार, उस्मानाबाद जालना, तसेच परिसरातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते. विजेत्यांना ११ हजार रूपयांपासून शंभर रूपयापर्यंत रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कालावधीत परिसरात अफाट उत्साह व प्रसन्नतेचे वातावरण होते. गावची यात्रा असल्याने नोकरी-व्यवसायनिमित्ताने बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ यात्रेनिमित्त एकत्र येत असल्याने एकमेकांच्या भेटीगाठी होऊन यात्रेला स्नेहसंमेलनाचा स्वरूप आले होते. यात्रेसाठी माहेरवासिनीही आपल्या गावी आवर्जून आले होते.