संत निवृत्तीनाथ निघाले माऊलींच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:05 AM2020-06-30T11:05:14+5:302020-06-30T11:22:28+5:30
यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी प्रथमच शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
Next
त्र्यंबकेश्वर (नाशिक)- यंदा कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी प्रथमच शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या बसमध्ये मोजलकयाच विश्वस्त सहभागी झाले. सकाळी तीर्थराज कुशावर्तावर निवृत्तीनाथांच्या पादुकांची विधीवत पूजा करून पूजा करण्यात आली. रस्त्यात कोठेही स्वागत सोहळा न होता बस थेट पंढरपूरला पोहोचणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने वारीला परवानगी नाकारल्याने यंदा वारीची परंपरा खंडीत झाली. त्यामुळे संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाने शिवशाही बसची व्यवस्था उपलब्ध करून दिली.