हनुमान टेकडीवर संत तुकाराम गाथा पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:17 AM2021-02-27T04:17:29+5:302021-02-27T04:17:29+5:30
------- मालेगाव कॅम्पातील रस्ते दुरुस्तीची मागणी मालेगाव : शहरातील मालेगाव कॅम्प भागात मोची कॉर्नर परिसरात रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले ...
-------
मालेगाव कॅम्पातील रस्ते दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरातील मालेगाव कॅम्प भागात मोची कॉर्नर परिसरात रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून संबंधितांनी रस्ते दुरुस्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती आहे रस्त्यात खड्डे असल्याने वाहनांचेही नुकसान होत असल्याची तक्रार आहे.
------
मालेगावात वाढत्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त
मालेगाव : शहर परिसरात मोठ्या प्रमाणात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात विविध भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे दिवसाआड शहरात घरफोड्या होत आहेत. घरमालक बाहेरगावी गेल्याची चोरटे संधी साधत आहेत. घराशेजारी लावण्यात आलेल्या दुचाकी चोरीचे प्रकार तर सर्रास घडत आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
------------
स्वर्ण प्राशन संस्कार शिबिर
मालेगाव : शहरातील साने गुरुजी आरोग्य मंदिरात गुरुवारी लहान मुलांसाठी स्वर्ण प्राशन संस्कार शिबिर घेण्यात आले. सकाळी नऊ ते साडेबारा वाजेदरम्यान सुमारे सहाशे बालकांनी सुवर्ण प्राशन केले मास्क लावून आणि कोरोनाचे नियम पाळूनच पालकांनी आपल्या मुलांना सकाळी साने गुरुजी रुग्णालयात आणल्याची माहिती जयेश शेलार यांनी दिली.
-----
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भीती
मालेगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण भागात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांच्या संख्येत घट झाली आहे. त्यात पोलिसांकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तोंडावर रुमाल बांधूनच शहरात फिरताना दिसत आहेत.