संतांनी जाती-जमातीच्या भिंती सैल केल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:14 AM2018-12-21T01:14:15+5:302018-12-21T01:15:36+5:30
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात.
कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरोबरीने महिला संतांनीदेखील जाती-जमातीच्या भिंती सैल करण्याचे अद्भुत कार्य केल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे साठावे पुष्प परशुराम सायखेडकर सभागृहात गुरुवारी (दि.२०) भवाळकर यांनी ‘महिला संतांचे क्रांतिकारक कार्य’ या विषयावर गुंफले. यावेळी त्यांनी १२व्या शतकापासून भारतात झालेला संत संप्रदायाचा उगम, पुरुष संतांसोबत महिला संतांचे सामाजिक योगदान, लोकसंस्कृती, संत साहित्य, भाषा संस्कृती, महिला संतांची कामगिरी, असा चौफेर आढावा आपल्या व्याख्यानातून घेतला.
भवाळकर म्हणाल्या, या महाराष्टÑात संत परंपरा मोठी असली तरी या परंपरेत होऊन गेलेली संत स्त्रियांची मालिकाही तितकीच मोठी आहे. महाराष्ट्रातील लोकांना संत माहीत आहेत; मात्र महिला संतांविषयी फारशी माहिती नाही. महिला संत मालिकेतदेखील सर्व जाती-जमाती व पंथांच्या स्त्रियांचा समावेश आढळून येतो. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, विठाबाई, विठाई, निर्मलाबाई, बहिणाबाई अशी कितीतरी नावे संत स्त्रियांची घेता येतील.
संत परंपरेत होऊ न गेलेल्या महिलांचे कार्यदेखील तितकेच क्रांतिकारक असल्याचे त्या म्हणाल्या. इतिहासाकडे सांस्कृतिक अंगाने बघितल्यास महिला संतांचे कार्य व त्यामधील सत्यतेचा प्रत्यय नक्कीच येतो. महाराष्टÑात उत्तर व दक्षिण भारतामधील संस्कृतीचा संगम झाल्याचे पहावयास मिळते.
सगळे संत पंढरीचा राजा विठ्ठलाचे उपासक होते, असेही भवाळकर यांनी यावेळी सांगितले. संतांनी निर्माण केलेल्या पार्श्वभूमीमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना सत्ता स्थापन करणे अधिक सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले.
‘मराठी पाट्या’ आंदोलन गमतीदार
महाराष्ट्रात भाषाभाषांमध्ये भेदाभेद केला जातो, ही खंत व्यक्त करताना भवाळकर यांनी ‘मराठी पाट्या’ लावण्याचा हट्ट धरणाऱ्यांना चपराक लावली. मराठी पाट्यांसाठी झालेले आंदोलन गमतीदार असेच होते. एखाद्या दुकानावर इंग्रजीत झळकणारे नाव मराठी अर्थात देवनागरी लिपित झळकले म्हणजे मराठीत झळकले, असा गोड गैरसमज करून घेत राजकीय पुढाºयांनी आंदोलन केले ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. लिपी बदलली म्हणजे भाषा बदलते असे अजिबात नाही, असे भवाळकर यांनी यावेळी सांगितले.