वावी येथे साईपालखी सेवा महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 05:34 PM2019-04-09T17:34:38+5:302019-04-09T17:34:51+5:30
सिन्नर : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र शिर्डी येथे होणाऱ्या रामनवमी उत्सवासाठी पायी जाणाऱ्या साईभक्तांची सेवा करण्यासाठी वावी येथे मंगळवार दि. ९ ते ११ एप्रिल या काळात साईभक्त सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती साई पालखी महोत्सवाचे प्रमुख महेश अग्रवाल यांनी दिली.

शिर्डी येथे रामनवमी उत्सवासाठी मुंबई महानगरासह वसई, विरार, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, नाशिक, सूरत, पालघर, डहाणू, जव्हार, नाशिक आदी ठिकाणाहून पायी दिंडी जात असतात. पायी दिंड्यामध्ये हजारोंच्या संख्येने साईभक्त असतात. त्यांची सेवा करण्यासाठी वावी व कसारा येथे साई पालखी सेवा संस्थान मुंबईकडून मागील २३ वर्षांपासून एक्युप्रेशर थेरोपिस्ट उपचार, पाणी, सरबत, फळ व राहण्याची सोय केली जाते. साईसेवा पालखी सेवा महोत्सवादरम्यान मंडप मुहूर्त, श्री साईबाबा मूर्ती स्थापना, आरती, भजन, कीर्तन असे कार्यक्र म पार पडणार आहे.