‘सायवा’ विभागीय नृत्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:06 AM2018-11-22T00:06:19+5:302018-11-22T00:17:23+5:30
स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेल्फेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोरा येथे घेण्यात आली.
नाशिक : स्कूल स्पोर्ट्स एन्ड युथ वेल्फेयर असोसिएशन (सायवा) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रातील विभागीय सायवा नृत्य स्पर्धा पाचोरा येथे घेण्यात आली. यामध्ये भुसावळ, जळगाव, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा एकेरी, समूह नृत्य प्रकारात घेण्यात आली. त्यात जळगाव प्रथम तर भुसावळ द्वितीय व नाशिक तृतीय क्र मांक मिळवला. या स्पर्धेचे आयोजन ग्रामीण भागातील मुलांना त्यांचे कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळण्यासाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेत एकेरी आणि समूह नृत्याला रोख रक्कम, नोंदणीकृत प्रमाणपत्र व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा शुभारंभ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व शिंदे अकॅडमीचे संचालक अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी सायवाचे महासचिव नीलेश राणे, उत्तर महाराष्ट्र संचालक सुनील मोरे तसेच सायवाचे पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून दीपक पालखेडकर (नाशिक), वर्षा हरसोले (मुंबई), आयुषी सोनवणे (ठाणे), योगीता काळे (अमरावती) यांनी उत्कृष्ट प्रकारे काम बघितले. या स्पर्धेत नवीन राज्यसचिव, जिल्हाध्यक्ष व सचिवांची नियुक्ती पत्र सायवाचे महासचिव नीलेश राणे यांच्या हस्ते चंद्रकांत सैंदाणे, मूर्तजा गिनाह, योगेश पाटील, सायली पालखेडकर, भारती कविटकर, सरिता घाटोळे, विशाखा ओझा यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक सुनील मोरे, सुरेंद्र चौधरी, गीता मोरे होते.