सांजेगाव दंगलप्रकरणी आठ आरोपींना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 01:14 AM2019-03-07T01:14:06+5:302019-03-07T01:14:37+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वरलगतच्या तळेगाव येथे बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियातून व्हायरल जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांमुळे इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी (दि.६) न्या.एन. जी. गिमेकर यांनी आठ आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी १८ हजारांचा दंड ठोठावला. पुराव्यांअभावी १३ संशयितांची या गुन्ह्यातून मुक्तता केली. ११ आॅक्टोबर २०१६ रोजी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेत महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला होता.

Sajjamajuri to eight accused in Sagejgaon riots | सांजेगाव दंगलप्रकरणी आठ आरोपींना सक्तमजुरी

सांजेगाव दंगलप्रकरणी आठ आरोपींना सक्तमजुरी

googlenewsNext
ठळक मुद्दे इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी

नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील तळेगावमध्ये एका बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियामधून व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांमुळे इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शिवारात तीव्र पडसाद उमटले होते. संपूर्ण गावात मोठी दंगल उसळली होती. या प्रकरणी बुधवारी (दि.६) न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन आठ आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीसह प्रत्येकी १८ हजारांचा दंड ठोठावला. तसेच पुराव्यांअभावी १३ संशयितांची या गुन्ह्णातून मुक्तता केली.
त्र्यंबकेश्वर येथे एका अल्पवयीन बालिकेवरील अत्याचाराची घटना २०१६ साली उघडकीस आली होती. ११ आॅक्टोबर २०१६ रोजी सांजेगाव शिवारात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटले होते. या पडसादाला हिंसक वळण लागले होते. वाहनांची जाळपोळ, हाणामाऱ्या, दगडफेकीसह एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला होता. शिवाजी बन्सी शिंदे, विजय बन्सी शिंदे, नकुसाबाई नामदेव सोनवणे, अलकाबाई सुरेश पवार आदींवर जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्यात अलकाबाई पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या.
याप्रकरणी वाडीवºहे पोलीस ठाण्यात फिर्यादी चिंतामण बुकाणे (४२, रा. सांजेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित २१ समाजकंटकांविरुद्ध प्राणघातक हल्ला, अ‍ॅट्रॉसिटी, दंगल जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिºहे यांनी या गुन्ह्णाचा तपास केला व १२ आॅक्टोबर २०१६ साली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरू होता. या गुन्ह्णात पोलिसांनी एकूण २१ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापैकी आठ समाजकंटकांविरुद्ध न्यायालयात पुरावे सादर झाले. उर्वरित १३ संशयितांची या गुन्ह्णातून मुक्तता करण्यात आली. याप्रकरणी सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. रवींद्र निकम यांनी युक्तिवाद करत १० साक्षीदार तपासले.ा सिद्धमोहन विठोबा गोवर्धने, अंकुश निवृत्ती गोवर्धने, सागर भास्कर गोवर्धने, राहुल रावसाहेब गोवर्धने, भाऊसाहेब काशीराम गोवर्धने, प्रकाश गेणू गोवर्धने, शिवाजी कारभारी गोवर्धने, नाना बाळू गोवर्धने (सर्व रा. सांजेगाव) यांच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. विशेष न्यायालयात न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी आरोपींना दोषी धरले. त्यांना दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १८ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. तसेच गुन्ह्यातील १३ संशयितांची पुराव्यांअभावी न्यायालयाने मुक्तता केली आहे.

Web Title: Sajjamajuri to eight accused in Sagejgaon riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.