चार दिवसांपूर्वीच साजू नाशिकमध्ये आला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:53 AM2019-06-15T01:53:44+5:302019-06-15T01:54:05+5:30
दरोडेखोरांशी दोन हात करत छातीवर गोळ्या झेलणारा साजू सॅम्युएल (२९) हा तरुण नवीन मुंबईतील नेरूळ येथील रहिवासी असून, मुथूट फायनान्स कंपनीच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील मुख्य कार्यालयात आयटी विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होता.
सिडको : दरोडेखोरांशी दोन हात करत छातीवर गोळ्या झेलणारा साजू सॅम्युएल (२९) हा तरुण नवीन मुंबईतील नेरूळ येथील रहिवासी असून, मुथूट फायनान्स कंपनीच्या नवी मुंबईतील सानपाडा येथील मुख्य कार्यालयात आयटी विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीस होता.
त्याच्याकडे महाराष्टÑातील मुथूट कंपनीच्या प्रमुख शहरातील कार्यालयातील संगणकीय दोष दूर करण्याचे काम सोपविण्यात आले होते. दक्षिण भारतातील केरळ येथील मूळ रहिवासी असलेल्या साजू हा मुंबईत आपल्या पत्नीसह राहत होता.
आठ दिवसांपूर्वीच
प्राप्त झाले होते पुत्ररत्न
आठ दिवसांपूर्वीच त्याला पुत्ररत्नदेखील प्राप्त झाले. नाशिकच्या कंपनीत संगणकीय दोष दूर करण्यासाठी चार दिवसांपूर्वीच साजू नाशकात आला होता. मात्र या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुथूट फायनान्स कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकसारख्या नवख्या ठिकाणी येऊनही त्याने दाखविलेल्या धाडसाचेदेखील कौतुक होत आहे.