हिंदी नाट्य स्पर्धेबाबत साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:00 PM2020-06-15T22:00:37+5:302020-06-16T00:06:17+5:30
नाशिक : यंदा ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली. अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे.
नाशिक : यंदा ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली. अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित
नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे. त्यामुळे या नाटकांतून नाट्यस्पर्धेचा निकाल लावावा, अशी मागणी मुंबईवगळता अन्य केंद्रांवर नाटक सादर झालेल्या ५६ संस्थांच्या वतीने सांस्कृतिक संचलनालयाकडे करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता बराच कालावधी जाणार आहे. शिवाय नाट्यगृह व गर्दी होणारे कार्यक्र म यावर बंदी असल्यामुळे स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.हिंदी हौशी नाट्य स्पर्धेत जेवढी नाटके सादर झाली त्यावर आधारित निकाल जाहीर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठी हौशी प्राथमिक स्पर्धा, हिंदी अंतिम स्पर्धा आणि मराठी अंतिम सह बालनाट्य, संस्कृत संगीत या सर्वच स्पर्धांचा सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च, भत्ते अद्याप देण्यात आलेले नाही.
-------------------------
नाशिकमधून ‘क्रांतिसूर्य’
नाशिक विभागातून अंबिका चौक सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘क्रांतिसूर्य’ या नाटकाचे सादरीकरण ठाणे केंद्रावर करण्यात आले होते. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे होते. या नाटकात नाशिकच्या तब्बल ३० कलाकारांनी सहभाग नोंदवला होता.