सप्तशृंगगड विकास आराखडा मंजुरीसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 06:34 PM2021-03-18T18:34:53+5:302021-03-18T18:35:43+5:30
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ...
सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत भेट घेऊन प्रलंबित असलेल्या सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर करण्याची मागणी केली आहे.
सप्तशृंगगडावरील पाणीटंचाई, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलवाहिनी, सुलभ स्वच्छतागृह, निवाराशेड, व्यावसायिक गाळे, सुसज्ज रुग्णालय, भक्तनिवास, बसस्थानक, गावअंतर्गत सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मुख्य रस्त्यावर डोम आदी कांमाचा विकास आराखडा तयार असून, मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. सदर विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याची मागणी यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास ह्यबह्ण वर्गाचा दर्जा मिळाला; परंतु अद्याप ग्रामपंचायतीला विकासासाठी कुठलाही निधी मिळाला नाही तसेच गेल्या अनेक वर्षांपासून सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईसंदर्भात प्रश्न सुटत नसल्याने भाविकांना व ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ह्यबह्ण वर्गाचा निधी त्वरित मिळावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन झिरवाळ यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, जीवन पवार, मधुकर गवळी, धनेश गायकवाड, रामप्रसाद बत्ताशे, राजेंद्र वाघ, साहेबराव निमकर, सुरेश बत्ताशे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढगे आदी उपस्थित होते.