धार्मिक कार्यक्रमांसाठी महसूल आयुक्तांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:03+5:302021-06-16T04:20:03+5:30
गेल्या दीड- दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. गावोगावाचे सप्ताह बंद झाले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये ...
गेल्या दीड- दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. गावोगावाचे सप्ताह बंद झाले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये व सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. वारकरी संप्रदायातील महान विभूतींनी समाजाला अपप्रवृत्तीपासून दूर ठेवून सन्मार्गाला लावण्याचे कार्य केलेले आहे व करीत आहेत. वस्तुस्थितीचा समसाफल्याने विचार करून इतर विविध क्षेत्रांत ज्याप्रमाणे निर्बंध शिथिल करून मर्यादित संख्येत परवानग्या दिल्या आहेत. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी देखील परवानगी देण्यात यावी. मार्गदर्शक तत्त्वांचे वारकऱ्यांकडून निश्चितच पालन केले जाईल. तरी धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळ विभागीय अध्यक्ष हभप वाल्मीक महाराज जाधव, उपाध्यक्ष हभप संतोष महाराज मोरे, खजिनदार हभप ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, मुख्य सचिव हभप प्रदीप जगताप, जिल्हा अध्यक्ष दिनकर पाटील आदींनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
फोटो : धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्तांना देताना अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष हभप वाल्मीक महाराज जाधव समवेत दिनकर पाटील, संतोष महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज सोनवणे, हभप प्रदीप जगताप आदी. (फोटो १५ सातपूर)