सांस्कृतिक संचलनालयाला हिंदी नाट्य स्पर्धेबाबत साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 06:28 PM2020-06-12T18:28:16+5:302020-06-12T18:32:05+5:30
नाशिक : यंदाच्या वर्षी ५९वी हिंदी राज्य नाट्य हौशी नाट्य स्पर्धेतील पुणे, नागपूर, ठाणे या केंद्रावर ५६ नाटके पार पडली. मात्र, मुंबई केंद्रावरील २५ नाटके सादर होणे बाकी असताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा बंद पडली.अतिमहत्त्वाच्या परीक्षादेखील झाल्या नसताना ही उर्वरित नाटके होण्यास प्रदीर्घ विलंब लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या नाटकांतून नाट्यस्पर्धेचा निकाल लावावा, अशी मागणी मुंबईवगळता अन्य केंद्रांवर नाटक सादर झालेल्या ५६ संस्थांच्या वतीने सांस्कृतिक संचलनालयाकडे करण्यात आली आहे.

या राज्य स्पर्धेत आतापर्यंत ५६ नाटके सादर झालेली आहेत. जवळपास ७० टक्के स्पर्धा पूर्ण झाली असताना स्पर्धा बंद पडली. सद्यस्थितीत राज्यातील वाढती रु ग्णसंख्या व विशेषत: मुंबईतील कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता मुंबई पूर्ववत होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. शिवाय नाट्यगृह व गर्दी होणारे कार्यक्र म यावर बंदी असल्यामुळे स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक परीक्षा कोरोनामुळे रद्द झाल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे याच धर्तीवर ५९वी हिंदी हौशी नाट्य स्पर्धेत जेवढी नाटके सादर झाली त्यावर आधारित निकाल जाहीर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठी हौशी प्राथमिक स्पर्धा, हिंदी अंतिम स्पर्धा आणि मराठी अंतिम सह बालनाट्य, संस्कृत संगीत या सर्वच स्पर्धांचा सादरीकरणाचा खर्च, प्रवास खर्च, भत्ते अद्याप देण्यात आलेले नाही. त्या रकमा सुद्धा संबंधित सर्व संस्थांच्या खात्यात जमा कराव्या, अशी विनंती सर्व संबंधित ५६ संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.