आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:05+5:302021-04-23T04:17:05+5:30

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी ऑक्सिजन ...

Sakade to the District Collector for oxygen of IMA office bearers | आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

आयएमएच्या पदाधिकाऱ्यांचे ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

Next

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी ऑक्सिजन पुरवठा व मागणी यामधील तफावतीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील ऑक्सिजनची तफावत तातडीने दूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळेस इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले की नाशिकची गरज ही साधारणपणे १२५ टनांपेक्षा जास्त आहे. मात्र, पुरवठा ८५ टन पेक्षाही कमी होत आहे. त्यामुळे साधारणपणे दररोज दिवसाला ४० टनापेक्षा अधिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत कशी कमी करता येईल आणि सरकारी पातळीवर जास्तीत जास्त ऑक्सिजन नाशिकला कसा वळवता येईल, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली. प्रशासनास आयएमएच्यावतीने कोरोना युद्धात पूर्णपणे सहकार्य असेल आणि रुग्णांच्या हितासाठी आम्ही सर्व डॉक्टर्स कटिबद्ध आहोत, असेही यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस, उपाध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ, खजिनदार डॉ. विशाल पवार, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, तसेच हॉस्पिटल ओनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पाटील, सचिव डॉ. सचिन देवरे , डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. नीलेश निकम, डॉ. नीलेश जेजुरकर, डॉ. प्रतिक्षित महाजन आदी उपस्थित होते.

इन्फो

वाढीव बेडची माहिती अपडेट करा

या भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. ऑक्सिजनची होणारी गळती कमी व्हावी, ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने कसा वापरावा व जास्तीत जास्त ऑक्सिजन रुग्णांना कसा मिळेल याची काळजी घेण्याबाबत प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे ज्या हॉस्पिटलला २० बेड असतील पण सध्या आता त्यांना कोरोना परिस्थितीमुळे ४० पेशंट दाखल करून घ्यावे लागत असतील तर, अशा बेडची संख्या वाढली आहे, तर अशा सर्व रुग्णालयांनी आपली बेड संख्या नाशिक मनपा पोर्टलवर अपडेट करून घ्यावी, जेणेकरून ही सर्व माहिती राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला सादर केली तर नाशिक जिल्ह्याला होणारा पुरवठा अधिक वाढवून घेता येईल, तसेच रेमडेसिविरचा पुरवठा वाढवून घेता येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Sakade to the District Collector for oxygen of IMA office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.