कोविड सेंटरमध्ये सुविधांसाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:12 PM2020-07-25T22:12:19+5:302020-07-25T23:53:09+5:30
सातपूर : येथील ईएसआय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असून, या सुविधा पुरविण्याचे साकडे निमाला घालण्यात आले आहे. त्यानुसार एन-९५ मास्क आणि २५ पीपीई किट देण्याचे मान्य केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सातपूर येथील राज्य कामगार विमा सोसायटीच्या (ईएसआय) रुग्णालयात ५० खाटा कोविड रुग्णांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. या डेडिकेटेड कोविड सेंटरमधील रुग्णांना सेवा देताना बऱ्याच साधन सामुग्री व वस्तूंचा अभाव असून, त्यात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय अधीक्षकांनी निमाला पत्र पाठवून मागणी केली आहे. दरम्यान, निमा कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी एक लाख रुपयांचे एन-९५ मास्क आणि २५ पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी दिली.