येमको बँकेच्या ठेवी परत मिळण्यासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:15 AM2021-08-01T04:15:04+5:302021-08-01T04:15:04+5:30
जिल्ह्यातील पहिली सहकारी व्यापारी बँक असलेल्या येमको बँकेने शहराच्या व्यापार व अर्थकारणाला मोठा आधार दिला आहे. नोटाबंदीपासून बँकेचे २१ ...
जिल्ह्यातील पहिली सहकारी व्यापारी बँक असलेल्या येमको बँकेने शहराच्या व्यापार व अर्थकारणाला मोठा आधार दिला आहे. नोटाबंदीपासून बँकेचे २१ कोटी रुपये जिल्हा बँकेच्या येवला शाखेत अडकून पडले आहेत. बँकेने वारंवार, तसेच वेळोवेळी संबधितांच्या भेटी घेऊन, मुख्य कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून ठेवी परत करण्याची मागणी केली. आतापर्यंत बँकेला ३ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम मिळाली. मात्र, उर्वरित पैसे मिळत नसल्याने संचालकांनी येथील जिल्हा बँक शाखेत धरणेदेखील धरले होते.
येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांच्याकडे बँकेचे उपाध्यक्ष सूरज पटणी यांनी बँकेचा अडकलेला निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यावेळी भुजबळ यांनी पटनी यांना नाशिक येथे बैठकीसाठी बोलावले होते. त्यानुसार उपाध्यक्ष पटणी, मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर गौरकर, व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य प्रशासक पिंगळे यांना भुजबळ फार्म येथे बोलावून घेत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. बँकेचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी अडकलेल्या ठेवी तत्काळ बँकेला उपलब्ध करून द्या, अशी सक्त सूचना त्यांनी केली.
फोटो- ३१ येवला येमको बँक
310721\31nsk_53_31072021_13.jpg
फोटो- ३१ येमको बँक