रखडलेल्या शासकीय अनुदानासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:51 PM2020-11-05T18:51:51+5:302020-11-05T18:53:42+5:30

सटाणा : येथील पालिकेच्या मागील तीन वर्षांपासून थकीत असलेल्या सहाय्यक अनुदान व प्रोत्साहन अनुदान तत्काळ द्यावे या मागणीसाठी राज्याचे नगरविकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांना नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी साकडे घातले.

Sakade for stagnant government grants | रखडलेल्या शासकीय अनुदानासाठी साकडे

सटाणा शहराच्या रखडलेल्या अनुदानाच्या मागणीसाठी नगरविकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांना मुंबई येथे निवेदन देताना नगराध्यक्ष सुनील मोरे समवेत दीपक पाकळे.

Next
ठळक मुद्देसुधारित आकृतिबंधानुसार ऐंशी पद भरतीचा प्रस्ताव शासनास सादर

सटाणा : येथील पालिकेच्या मागील तीन वर्षांपासून थकीत असलेल्या सहाय्यक अनुदान व प्रोत्साहन अनुदान तत्काळ द्यावे या मागणीसाठी राज्याचे नगरविकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांना नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी साकडे घातले.
पालिकेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (दि.५) नगरविकास विभागाचे प्रशासन संचालनालयाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या दालनात नगराध्यक्ष मोरे यांनी निवेदन सादर करून साकडे घातले.
यावेळी शहर विकासाच्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तीन वर्षांपासून रखडलेले सहाय्यक अनुदान रक्कम, मागील चार वर्षांपासून ९५ टक्क्याहून अधिक करवसुली करीत असल्यामुळे शासन प्रोत्साहनपर अनुदान देय रखडले आहे. हे अनुदान तत्काळ मिळावे जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत निवृत्तिवेतन अदा करता येणार आहे. तसेच शहर विकासाचे कामे करण्यासाठी हा निधी आवश्यक असतो, हे दोन्ही अनुदान पालिकेस प्राप्त झाल्यास शहर विकासाचा वेग अधिक प्रमाणात जलद होईल. त्याच बरोबर पालिका स्थापन झाल्यानंतर तीनशेहून अधिक कर्मचारी कार्यरत होते. परंतु कालांतराने बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
रिक्त पदे भरा .....
शासनाने मंजूर केलेल्या सुधारित आकृतिबंधानुसार ऐंशी पद भरतीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यास मंजुरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली. यावेळी सकारात्मक चर्चा करून लवकर कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन यावेळी आयुक्त कुलकर्णी यांनी दिले. याप्रसंगी नगराध्यक्ष मोरे यांच्यासमवेत आरोग्य सभापती दीपक पाकळे उपस्थित होते.
 

Web Title: Sakade for stagnant government grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.