सटाणा येथील कार्यालये सुरू करण्याचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:09 PM2020-06-08T22:09:09+5:302020-06-08T23:56:27+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सटाणा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व संबंधित शासकीय कार्यालये तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

Sakade to start offices at Satana | सटाणा येथील कार्यालये सुरू करण्याचे साकडे

सटाणा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करताना सुनील मोरे, दीपक पाकळे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देइमारत पडून : नगराध्यक्षांसह शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सटाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सटाणा येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व संबंधित शासकीय कार्यालये तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.
सोमवारी (दि. ८ ) नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मांढरे यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले. याबाबत अपेक्षित कार्यवाही करण्यासाठी येत्या सप्ताहात प्रशासकीय इमारतीस भेट देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. येथील तहसील कार्यालय आवारात नवीन प्रशासकीय इमारत बांधून गेल्या अनेक वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे तालुका पातळीवरील सर्व शासकीय कार्यालये शहराच्या विविध विभागात ठिकठिकाणी कार्यरत आहेत. सर्वाधिक महत्त्वाचे प्रांत अधिकारी कार्यालय तर शहरापासून दूर अंतरावरील शासकीय विश्रामगृहात चालवले जात आहे. यामुळे विविध शासकीय कामाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेची प्रचंड फरफट होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीत कामकाज सुरू होणे अत्यावश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी विखुरलेली शासकीय कार्यालये या प्रशासकीय इमारतीत आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आरोग्य सभापती दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर आदी उपस्थित होते.
या प्रशासकीय इमारतीवर शासनाचा अडीच कोटी रु पये खर्च झाला आहे. बांधकाम होऊन सहा वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. इमारतीचा वापर होत नसल्याने देखभाल-दुरु स्तीअभावी इमारतीचेही नुकसान होत आहे. दुसरीकडे मात्र इमारतीअभावी विविध शासकीय विभागांना भाडेतत्त्वावर कार्यालये चालवावी लागत आहे. यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचेही जिल्हाधिकारी मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

बागलाणच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, लागवड अधिकारी कार्यालय, उपकोषागार यांचे कार्यालये देखील स्थलांतरित करण्याच्या सूचना संबंधित खातेप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. लवकरच कार्यवाही होऊन एका छताखाली कार्यालये सुरू होऊन नागरिकांची सोय होणार आहे.
- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण

Web Title: Sakade to start offices at Satana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.