दुध उत्पादक शेतकर्यांना अनुदानासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:36 PM2020-07-26T18:36:58+5:302020-07-26T18:37:47+5:30

येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिलासा द्यावा अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.

Sakade for subsidy to milk producing farmers | दुध उत्पादक शेतकर्यांना अनुदानासाठी साकडे

दुध उत्पादक शेतकर्यांना अनुदानासाठी साकडे

Next
ठळक मुद्देदूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत

येवला : मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी घटली असून दूध शिल्लक राहत आहे. डेअरी देखील दूध घेत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. दुधाचे दर 34 रु पये वरून थेट आठ रु पयांवर घसरल्याने, शासनाने दुध उत्पादक शेतकर्यांना थेट अनुदान देऊन दिलासा द्यावा अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.
खासदार पवार, येवला मार्गे औरंगाबादला जात असताना पालकमंत्री भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ थांबले होते. यावेळी पदाधिकार्यांनी त्यांना निवेदन दिले. दुधाला कोरोना काळात मार्चपूर्वी 32 ते 34 रु पये प्रति लिटर दर होता. आज, 18 ते 20 रु पये दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने जनावरे कशी सांभाळायची असा प्रश्न निर्माण झाल्याचे, निवेदनात म्हटले आहे. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, वसंत पवार, राधाकिसन सोनवणे, किसन धनगे, रामदास काळे, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

Web Title: Sakade for subsidy to milk producing farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.