साकोरे ठरले डिजिटल ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:37 PM2019-08-10T22:37:29+5:302019-08-10T22:38:30+5:30
कळवण : कळवण - नाशिक रस्त्यावरील मौजे साकोरे गाव, साकोरेपाडा या ग्रुप ग्रामपंचायत गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम होण्याचा बहुमान मिळविला असून, साकोरेपाडाही लवकरच कॅशलेस होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कळवण - नाशिक रस्त्यावरील मौजे साकोरे गाव, साकोरेपाडा या ग्रुप ग्रामपंचायत गावाने कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केल्याने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम होण्याचा बहुमान मिळविला असून, साकोरेपाडाही लवकरच कॅशलेस होणार आहे.
कळवणपासून ७ किमी अंतरावर असलेल्या कळवण ते नाशिक या प्रमुख मार्गावरील साकोरे व साकोरेपाडा या गावांची तालुक्यात शेती व्यावसायिक गाव म्हणून ओळख आहे. या गावात बँक अथवा पतसंस्था अशी कोणतीच
सुविधा नव्हती. त्यांना आर्थिक व्यवहारांसाठी कळवण या तालुक्याच्या गावाचाच सहारा घ्यावा लागत असे. मात्र पोस्ट खात्याने घर तेथे इंडिया पोस्ट पेमेंट खातेदार तयार आहेत व सर्वांचे
आर्थिक व्यवहार पोस्टात सुरू झाले आहेत.
माझा अभिमान, सक्षम ग्राम या कार्यक्रमांतर्गत डाक विभागाने कळवण तालुक्यातील पहिले डिजिटल ग्राम म्हणून साकोरे गावाची निवड झाली असून, साकोरेपाडा लवकरच कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहे.
या गावात एकही आर्थिक व्यवहार करणारी वित्तीय संस्था नसल्याने आर्थिक व्यवहार करण्यासाठी येथील नागरिकांना कळवण या तालुक्याच्या गावात जावे लागत होते. टपाल बँकिंगमुळे आता गावात आर्थिक व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे तेही कॅशलेस. या गावातील सर्व कुटुंबातील प्रत्येकी एका व्यक्तीचे तसेच व्यावसायिकांचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते खोलून यातून आर्थिक व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सर्व अनुदान, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या, सबसिडी या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन असून, वीजबिले, विमा अशा सर्व प्रकारचा भरणा येथून करणे शक्य होणार आहे. येथील ग्रामस्थांचा विश्वास, डाक विभागाचे सहकार्य आणि साकोरे गावाचे पोस्ट मास्टर एस.व्ही. जोशी यांच्या प्रयत्नातून गाव डिजिटल ग्रामकडे वळले आहे. त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंटमार्फत साकोरे व साकोरेपाडा ही गावे सक्षम ग्राम म्हणून घोषित करण्यात आली.
मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक नागेश्वर रेड्डी, ब्रँच मॅनेजर पी.व्ही. क्षीरसागर, उपविभागीय डाक निरीक्षक डी.जी. उमाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पोस्टमास्टर साकोरे एस.व्ही. जोशी, सरपंच चंद्राबाई बोरसे, पोलीसपाटील भारत गवळी, ग्रामसेवक संजय पवार व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.