साकूर ते व्हीटीसी फाटा रस्ता हरवला खड्ड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:35+5:302021-08-21T04:18:35+5:30

इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा हा राज्यमार्ग क्रमांक ३७ साकूर गावातून जात असून, येथील मुख्य चौकात पावसाळ्यात पाणी ...

Sakur to VTC fork road lost in the pit! | साकूर ते व्हीटीसी फाटा रस्ता हरवला खड्ड्यात!

साकूर ते व्हीटीसी फाटा रस्ता हरवला खड्ड्यात!

Next

इगतपुरी तालुक्यातील साकूर ते व्हीटीसी फाटा हा राज्यमार्ग क्रमांक ३७ साकूर गावातून जात असून, येथील मुख्य चौकात पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना दैनंदिन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा सांगूनदेखील दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित राज्यमार्गाच्या दुरुस्ती कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना साकूर ग्रामपंचायतीच्या वतीने कारण नसताना खर्च करण्यात येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याचे ५०० मीटर सिमेंट काँक्रीटीकरण करून भूमिगत नाल्या बांधून सांडपाण्याचे नियोजन करावे, तसेच या राज्य मार्गावरील साचलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा दुरुस्ती न झाल्यास हा राज्यमार्ग बंद करण्यात येईल असा इशारा सरपंच विनोद आवारी, तुकाराम सहाणे, दिनकर सहाणे, दत्ता सहाणे, संतोष सहाणे, मधुकर सहाणे, सुनील सहाणे, मिलिंद कुकडे, दत्तात्रय आवारी, अनिल उन्हवणे, विष्णू सहाणे आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट...

साकूर ते व्हीटीसी फाटा या चौदा किलोमीटरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा रस्ता नेहमीच खासगी वाहने, बस, विद्यार्थी, तसेच ब्रिटिशकालीन दारणा धरणावर येणाऱ्या पर्यटकांमुळे गजबजलेला असतो; परंतु सध्या या रस्त्याचे पाणी गावातील मुख्य असलेल्या चौकात साचल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन दुरुस्ती करावी.

- विनोद आवारी, सरपंच, साकूर

फोटो - २०साकूर १

साकूर ते व्हीटीसी फाटा या राज्य मार्ग क्रमांक ३७ ची मोठमोठे खड्डे पडल्यामुळे झालेली अवस्था.

200821\img_20210819_143032.jpg~200821\20nsk_14_20082021_13.jpg

साकूर ते व्हीटीसी फाटा रस्त्याची झालेली चाळण.~साकुर ते व्हीटीसी फाटा या राज्यमार्ग क्रमांक ३७ ची मोठमोठे खड्डे पडल्यामुळे झालेली अवस्था. 

Web Title: Sakur to VTC fork road lost in the pit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.