रक्षा विसर्जन नदीन न करण्याचा साकूरकरांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 06:29 PM2020-07-26T18:29:34+5:302020-07-26T18:31:35+5:30

नांदूरवैद्य : व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची रक्षा नदीत न टाकता शेतात खड्डा खोदून त्यात रक्षा विसिर्जत करून त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याचा एकमुखी निर्णय इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

Sakurkar's decision not to immerse Raksha | रक्षा विसर्जन नदीन न करण्याचा साकूरकरांचा निर्णय

साकूर येथे रक्षा विसर्जित केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करताना योगेश सहाणे, संजय सहाणे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देउपक्रम : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प

नांदूरवैद्य : व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याची रक्षा नदीत न टाकता शेतात खड्डा खोदून त्यात रक्षा विसिर्जत करून त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याचा एकमुखी निर्णय इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
या उप्रकमाची सुरुवात येथील सहाणे कुटुंबीयांच्या माध्यमातून करण्यात आली. साकूर येथील तानाजी कोंडाजी सहाणे यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहाणे परिवाराने रक्षा नदीत न टाकता आपल्या शेतातच एक खड्डा खोदून त्यात रक्षा विसर्जन करण्याचा संकल्प ग्रामस्थांसमोर मांडला. या उपक्रमास ग्रामस्थांनीही होकार देत यापुढे गावात कोणाचही मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारानंतर रक्षा विसर्जन नदीत न करता खड्डा खोदून ती त्यात टाकून व वेगवेगळ्या प्रकारच्या वन औषधी वृक्षाची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नदीचे पावित्र्य राखण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करण्यास मदत होणार असल्याची भूमिका मांडण्यात आली. सरपंच विनोद आवारी, योगेश सहाणे, संजय सहाणे यांच्यासह ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
कोट
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्यानंतर आपण ती रक्षा नदीपात्रात टाकून देतो. यामुळे जलप्रदुषण होऊन नदी विद्रुप होते. तेव्हा पर्यावरणाचे संतुलन व जलप्रदुषण रोखण्यासाठी गावातील मृत्यू झालेल्या व्यक्तीची रक्षा नदीपाञात विसर्र्जित न करता शेतात खड्डा करून त्यात विसर्जन करु न त्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावल्याचा उपक्र म ग्रामस्थांच्या मदतीने सुरू करण्यात आला आहे.
- विनोद आवारी, सरपंच, साकूर.

Web Title: Sakurkar's decision not to immerse Raksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.