एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 09:32 PM2020-04-28T21:32:31+5:302020-04-28T23:01:43+5:30

नाशिक : आधीच तोटा त्यात वेतन करारास विलंब आणि आता कोरोनाचा प्रकोप यामुळे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळते की नाही याविषयी चिंता वाटू लागली आहे.

 Salary concerns for ST employees | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची चिंता

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची चिंता

Next

नाशिक : आधीच तोटा त्यात वेतन करारास विलंब आणि आता कोरोनाचा प्रकोप यामुळे राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन मिळते की नाही याविषयी चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, वेतनात कोणतीही कपात करू नये, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.
सातत्याने आर्थिक संकटाचा सामना करणाºया राज्य परिवहन महामंडळाला यंदा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. गत वर्षात एसटी महामंडळाने अनेक उपाययोजना करत कोट्यवधींचा खर्च केला आहे. प्रत्यक्षात कर्मचाºयांना त्याचा कोणताही लाभ झालेला नाही. मध्यंतरी कामगारांचा वेतन करार चांगलाच गाजला, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. या वेतन करार मुद्द्यावर महामंडळात अनेक हालचाली झाल्या, मात्र प्रत्यक्षात काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे अजूनही हा करार रखडलेला आहे. वेतन कराराच्या अनास्थेमुळे कर्मचारी नाराज असताना कर्मचाºयांना आता वेतनाची चिंता लागली आहे.
राज्यात निर्माण झालेल्या कोरोना विषाणूचा राज्य परिवहन महामंडळलादेखील झटका बसल्याचे दिसून येते. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्नाचे स्रोत बंद झाले आहेत.

Web Title:  Salary concerns for ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक