पुरु षोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पगारे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:41 PM2020-07-30T23:41:18+5:302020-07-31T01:30:04+5:30
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : येथील पुरुषोत्तम हायस्कूलचा दहावीचा निकाल ९६.७१ टक्के लागला. सत्यजित चंद्रशेखर पगारे याने ९८.४० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम आला. श्रेयस संजय बोराडे याने ९६.८० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर कौस्तुभ रामचंद्र चौधरी (९५.४०) तृतीय क्रमांक मिळवला. शाळेतून एकूण ३०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. २९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ९८ विशेष प्रावीण्यासह, १०३ ग्रेड १, ६२ ग्रेड-२, तर ग्रेड ३मधून १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला.
र.ज. चौहान गर्ल्स हायस्कूल
र. ज. चौहान (बी) गर्ल्स हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. आदिती दिलीप लांडगे हिने ९९.२०टक्के गुण मिळवत प्रथम, ऋचा राजेश अष्टेकर हिने ९९ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर अर्पिता कैलास पवार आणि प्रज्ञा जगदीश बागडे यांनी प्रत्येकी ९७.२० गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
अभिनव आदर्श हायस्कूलचे यश
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित अभिनव आदर्श हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. भूमी वाघ, यश वारघडे (९०.६०) यांनी संयुक्त प्रथम मिळवला. वैष्णवी घोलप (९०.२०) द्वितीय, नताशा भामरे (८९.६०) तृतीय आली.टिबरेवाला स्कूललेट जयकुमार टिबरेवाला इंग्लिश मीडिअम स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. ७७विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. पारस हितेंद्र वानखेडे (९२.६०) प्रथम, अनुष्का सचिन चव्हाण (९२.६०) द्वितीय, तर वर्षा संतोष रोकडे आणि नूपुर गणेश निसाळ यांनी प्रत्येकी९१.६० टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक प्राप्त केला.४४ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत झाले.
२६ विद्यार्थ्यांना ग्रेड एक, तर २६ विद्यार्थ्यांनी ग्रेड २ मधून यश मिळवली.