सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:36 PM2019-10-10T23:36:37+5:302019-10-10T23:40:10+5:30
नाशिक : महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात दिवाळी सण आल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना २४ आॅक्टोबर-पूर्वीच मासिक वेतन करण्यात यावे, असे आदेश राज्याच्या वित्त विभागाने सर्वच शासकीय खात्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी खातेप्रमुखांची धावपळ उडाली आहे.

शुक्रवार, दि. २५ आॅक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून, वर्षातून एकदाच येणारा हा सण असल्यामुळे कपडेलत्ते, सणासुदीचे गोडधोड आदी गोष्टींसाठी खर्च होत असतो. शासकीय कर्मचाºयांचे
वेतन दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात केला जातो. दिवाळी महिन्याच्या अखेरीस येत असल्यामुळे कर्मचारी, अधिकाºयांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दिवाळीपूर्वीच त्यांना आॅक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला.