नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्यांचे वेतन कापणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:50 AM2019-06-15T01:50:43+5:302019-06-15T01:51:40+5:30
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी समुपदेशनाने बदल्या करूनही काही खातेप्रमुखांनी अद्यापही बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत, तर काहींनी बदल्यांचे आदेश काढूनही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, जे कर्मचारी बदलीच्या जागी हजर झाले नाहीत, त्यांचे वेतन कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी समुपदेशनाने बदल्या करूनही काही खातेप्रमुखांनी अद्यापही बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत, तर काहींनी बदल्यांचे आदेश काढूनही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, जे कर्मचारी बदलीच्या जागी हजर झाले नाहीत, त्यांचे वेतन कपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारने यंदा एकूण बदलीपात्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या तुलनेत फक्त दहा टक्केबदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेने ३० मेपासून शिक्षण विभाग वगळता सर्वच विभागाच्या कर्मचाºयांच्या बदल्यांसाठी समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्यांची कार्यवाही राबविली. सलग तीन ते चार दिवस चाललेल्या या प्रणालीत जवळपास दोनशेहून अधिक कर्मचाºयांच्या सोयीनुसार बदल्या करण्यात
आल्या. त्यात प्रामुख्याने बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागातील रिक्तपदे भरण्यावर यात भर देण्यात आला, तर आरोग्य व पाणीपुरवठा विभागात रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या बदल्या केल्यास असमतोल होण्याची शक्यता व्यक्तकरून प्रशासनाने आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील बदल्या रद्द केल्या.
या संदर्भातील तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्याने त्यांनी प्रत्येक खातेप्रमुखांंकडून याबाबतची माहिती तत्काळ मागविली असून, जे कर्मचारी बदलीचे आदेश बजावूनही नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत, त्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे, तर काही खातेप्रमुखांनी अद्याप आदेशच काढले नसल्याने त्यांनाही विचारणा करण्यात येणार आहे.
कर्मचाºयांमध्ये नाराजी
बदल्यांची कार्यवाही पूर्ण होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी काही खातेप्रमुखांनी अजूनही बदली झालेल्या कर्मचाºयांच्या आदेश काढले नाहीत, तर काहींनी आदेश काढूनही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बदली झालेल्या कर्मचाºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.