रेमडेसिविरच्या नावाखाली भुलीच्या इंजेक्शनची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:18+5:302021-05-08T04:15:18+5:30

चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास किरण सुभाष साळवे (३३, रा. मनमाड) ...

Sale of anesthetic injections under the name Remedesivir | रेमडेसिविरच्या नावाखाली भुलीच्या इंजेक्शनची विक्री

रेमडेसिविरच्या नावाखाली भुलीच्या इंजेक्शनची विक्री

Next

चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास किरण सुभाष साळवे (३३, रा. मनमाड) व रोहित घरटे (रा . कल्याण) हे दोघे संशयित बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले होते. याबाबत चांदवड शहर शिवसेनाप्रमुख संदीप मधुकर उगले यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरु्द्ध गुन्हा दाखल केला. त्यापैकी साळवे यास ताब्यात घेण्यात आले होते.

इन्फो

फसवणुकीचा गुन्हा दाखल

रेमडेसिविरची गरज असलेल्या अशाच रुग्णांच्या नातेवाइकांना हेरून बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती शिवसेना शहराध्यक्ष संदीप उगले व पांडुरंग भडांगे, दीपक शिरसाठ, धीरज संकलेचा यांना कळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून संशयित तरुणास पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर कल्याण येथील संशयित साथीदार रोहित घरटे याच्यावरदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्फाे

..तर रुग्णाच्या जिवावर बेतले असते

संशयितांकडील असलेल्या बाटलीतील द्रव्याची पडताळणी केली असता ते भूल देण्यासाठी लागणाऱ्या लिग्नोकेन नावाचे इंजेक्शन असल्याचे डॉ. रमाकांत सोनवणे यांनी तपासणी केल्यानंतर उघड झाले. हे इंजेक्शन घाई-गडबडीत रुग्णास दिले गेले असते तर ते रुग्णाच्या जिवावर बेतले असते. याबाबत भूलतज्ज्ञ डॉ. शशिकांत देवढे यांनी सांगितले, सदर इंजेक्शन भूल देण्यासाठी वापरतात; पण रक्तवाहिन्यांमधून देता येत नाही. जागेवर बधिरपणा आणण्यासाठी त्याचा वापर होतो. चुकून जरी हे रक्तवाहिनीतून शरीरात गेले तर मेंदू आणि हृदयावर याचे दुष्परिणाम जाणवतात. रुग्णाला झटके येतात व हृदयक्रिया बंद पडून मृत्यूदेखील होऊ शकतो.

---------------------------------------------------

फोटो- ०७ चांदवड क्राइम

चांदवड येथे रेमडेसिविर इंजेक्शनच्या नावाखाली बनावट औषधाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीसमवेत पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक विशाल सणस, पोपट कारवाल आदी.

===Photopath===

070521\07nsk_29_07052021_13.jpg

===Caption===

फोटो- ०७ चांदवड क्राइम चांदवड येथे रेमडीसिव्हर इंजेक्शनच्या नावाखाली बनावट औषधाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपी समवेत पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक विशाल सणस, पोपट कारवाल आदी. 

Web Title: Sale of anesthetic injections under the name Remedesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.