पंचवटीत गुटख्याची विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:14 PM2018-07-30T12:14:31+5:302018-07-30T12:16:49+5:30

अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

Sale of gutkha in Panchavati continued | पंचवटीत गुटख्याची विक्री सुरूच

पंचवटीत गुटख्याची विक्री सुरूच

Next
ठळक मुद्देअन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक/पंचवटी : गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गुटखाविक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केवळ धातूरमातूर कारवाई केली जाते. पंचवटी विभागातील पानटपरी, चहाटपरी ते किराणा दुकान एवढेच नव्हे तर हॉटेलांमध्येही गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते. एकीकडे शासनाकडून गुटख्यावर बंदी असल्याचे सांगून कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे पान दुकानदार तसेच अन्य दुकानात उघडपणे गुटख्याची विक्री केली जाते. नाशिक शहरात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे. अनेकदा याबाबत पोलिसांनाही माहिती मिळते; मात्र त्यांच्याकडूनही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.
पंचवटी विभागात गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुटखा जप्तीची कारवाई केली गेली व या कारवाईत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा गुटखा पकडला गेला; परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती न केल्याने गुटखा नेमका पकडला कोणी व कारवाई केली कोणी हे गुलदस्त्यातच आहे; मात्र पोलिसांच्या पथकाने गुटखा पकडल्याची चर्चा पोलीस कर्मचाºयांत उघडपणे सुरू आहे.

Web Title: Sale of gutkha in Panchavati continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.