बिबट्याच्या कातडीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:20 AM2022-02-05T00:20:01+5:302022-02-05T00:20:30+5:30

देवगाव : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये इगतपुरी तालुक्यातील तीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असून एकूण सात आरोपी आहेत. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. २०१८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जेरबंद केले होते.

Sale of leopard skin | बिबट्याच्या कातडीची विक्री

बिबट्याच्या कातडीची विक्री

Next
ठळक मुद्देइगतपुरी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाच जणांना अटक

देवगाव : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींमध्ये इगतपुरी तालुक्यातील तीन, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असून एकूण सात आरोपी आहेत. या प्रकारामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. २०१८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जेरबंद केले होते.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दि. १९ जानेवारीला वनपरिक्षेत्र वाशाळामधील मौजे वाशाळा गावाच्या परिसरात वन्यप्राणी बिबट्याच्या कातड्याचा व्यापार होत असल्याच्या गुप्त बातमीवरून शहापूर वनविभागाने सापळा रचला. या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन्य प्राणिमित्र संतोष जगदाळे यांनी बनावट ग्राहक बनून आरोपींना संपर्क केला. आरोपींनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तेथे त्यांना बिबट्याच्या कातड्याची मोबाईलवरील व्हिडीओ दाखवून त्याचा व्यवहार करायचा असल्याचे सांगितले. परंतु त्या दिवशी आरोपींनी व्यवहार केला नाही. त्यानुसार १९ जानेवारीपासून गुन्ह्यात सहभागी आरोपींनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्याचे ठरविले. त्यानुसार बुधवारी (दि.२) बिबट्याची कातडी व्यवहारासाठी पहिल्यांदा घाटन देवी मंदिर परिसरात ठरले. यानंतर लगेच ठिकाण बदलून इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावाजवळील घोटी, सिन्नर रस्त्यालगत ठरले.
त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व शहापूरचे सहायक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाशाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल गोदडे, खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी संयुक्त सापळा रचला. बनावट ग्राहक बनून आरोपी समोर उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत गेले असता बिबट वन्यप्राणीचे कातड्याचा व्यवहार करताना सात आरोपी आढळले. त्यांच्याकडे बिबट्याचे कातडे नग एक आणि चार मोटरसायकली या मुद्देमालासह त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

या सापळ्यात आरोपी काळू सोमा भगत (रा. भावली ता. इगतपुरी), अशोक सोमा मेंगाळ (रा. भावली ता. इगतपुरी), योगेश लक्ष्मण अंदाडे (रा. फांगुळगव्हाण ता. इगतपुरी), मुकुंदा सोमा सराई (रा. अस्वली हर्ष ता. त्र्यंबकेश्वर), गोटीराम एकनाथ गवारी (रा. सामोडी ता. त्र्यंबकेश्वर), रघुनाथ शंकर सातपुते (रा. मोखाडा ता. जव्हार. जि. पालघर), अर्जुन गोमा पानेडा (रा. चाफ्याचापाडा (शिरोळ) ता. शहापूर जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींवर वन्यजीव अधिनियम अन्वये गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Sale of leopard skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.