चढ्या दराने कांदा बियाणांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:01 PM2020-10-10T23:01:23+5:302020-10-11T00:38:58+5:30
सायगाव : गत वर्षीच्या रोगट हवामानामुळे लाल व उन्हाळ कांदयाचे बियाणे शेतकऱ्यांना साधले नाही. परिणामी या हंगामात शेतकºयांनी कांदा ...
सायगाव : गत वर्षीच्या रोगट हवामानामुळे लाल व उन्हाळ कांदयाचे बियाणे शेतकऱ्यांना साधले नाही. परिणामी या हंगामात शेतकºयांनी कांदा बियाणे निर्मिती करणाºया विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यावर भर दिला आहे. शेतकºयांजवळ स्वत:चे बियाणे उपलब्ध नसल्याने बियाण्यांची वाढती मागणी लक्षात घेत कंपन्यांकडून तीन पट दराने बियाण्यांची विक्र ी केल्या जात असल्याने शेतकºयांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे कांदा बियाणांबाबत कंपन्या कोणतीच गॅरंटी देत नसल्याने स्थानिक विक्र ेतेही हात वर करत आहे. केवळ नशिबावर हवाला ठेवून शेतकरी कांद्याचा हंगाम फुलवण्याचे स्वप्न बघत आहे.
येवला तालुक्यात तीन हंगामात घेतला जाणाºया पोळ, रांगडा, उन्हाळ कांदयाची लागवड सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते. त्यात पोळ व रांगडा (लाल कांदा) हे १४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असते. तर १५ ते १८ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड दरवर्षी केली जाते. बियाण्यांची टंचाई व वाढते भाव यामुळे यावर्षी उन्हाळ कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सततच्या पावसाने लाल कांदयाची रोपे सडली. विविध कंपन्यांची बियाणे विकत आणुन पुन्हा रोपे टाकली. या बियाण्यांची उगवण क्षमता केवळ ४० ते ५० टक्के इतकीच राहिली. त्यामुळे लाल कांद्याचे लागवड क्षेत्र निम्याने कमी झाले. त्यात पुन्हा पावसाने कांदा पिक खराब झाले. बियाणे टंचाईच्या पाश्वभूमिवर बाजारात बोगस बियाणे विक्र ेत्यांचा सुळसुळाट आहे. केवळ रोप उतरून उपयोग नाही तर कांदा पिकाला दर्जा व उत्पादन मिळणे ही महत्वाचे आहे. शेतकºयांची ही लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
कंपन्यांकडून हमी नाही
रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचा हंगाम तरी वाया जावू नये, या आशेपोटी शेतकरी चढया दराने का होईना पण बियाणे खरेदी करतांना दिसत आहे. बाजारात विविध कंपन्यांकडून कांद्याचे बियाणे विकले जात आहे. दीड महिन्यांपूर्वी काही कंपन्यांनी १ हजार ८०० रु पये प्रति किलो दराने कांदा बियाणे विकले. वाढती मागणी लक्षात घेता आज त्याच बियाण्यांची किंमत ४ हजार ५०० रूपये प्रति किलो दराने केली जात आहे. आधी तुम्ही चार दाणे टाकुन पहा, उतरले नाही तर बियाणे परत करा. अशी हमी एक दोन कंपन्या देत आहेत, मात्र इतर कंपन्या, विक्र ेते कोणतीच हमी न घेता सर्रास बियाण्याची विक्र ी करत आहे.