कळवणमध्ये विविध भागात भाजीपाला विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 02:42 PM2020-03-28T14:42:09+5:302020-03-28T14:42:52+5:30
शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरिकांना आपल्या परिसरातच भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
कळवण : शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरिकांना आपल्या परिसरातच भाजीपाला उपलब्ध होणार आहे.
सध्या रामनगर पुलाजवळ असलेल्या भाजी मंडईमध्ये भाजीपाला विक्र ी होत होती. मात्र आता पुढील काही दिवस दैनंदिन ठिकाणी भरणारा भाजी बाजार बंद करण्यात आला असून शहरातील शिवाजीनगर, गणेशनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक,ओतूर रोड, संभाजीनगर, रामनगर या विविध भागात भाजीपाला विक्रेत्यांनी गाडी लावून ग्राहकांना योग्य अंतर ठेऊन भाजीपाला विक्र ीच्या सूचना नगरपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने लोकांची गर्दी होऊ नये म्हणून विविध भागात भाजीपाला विक्रीचा निर्णय घेण्यात घेतला आहे. आपल्या परिसरात भाजीपाला उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये.
-डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी,कळवण नगरपंचायत