बाजार समितीसाठी २१८ अर्जांची विक्री

By admin | Published: June 17, 2015 01:39 AM2015-06-17T01:39:12+5:302015-06-17T01:41:59+5:30

बाजार समितीसाठी २१८ अर्जांची विक्री

Sales of 218 applications for market committee | बाजार समितीसाठी २१८ अर्जांची विक्री

बाजार समितीसाठी २१८ अर्जांची विक्री

Next

  नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कालपर्यंत एकूण २१८ अर्जांची विक्री करण्यात आली असून, अर्ज नेणाऱ्यांमध्ये आमदार अपूर्व हिरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व संचालकांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच जणांनी अर्ज दाखल केले आहेत. काल (दि.१६) अर्ज विक्रीत सोसायटी गटातून रावसाहेब कोशिरे गटातून २, श्रीमती प्रभावती बाळासाहेब मोराडे - २, मोहनराज खेमराज मोराडे व्यापारी गट - २, मदनराव पोपटराव पिंगळे सोसायटी गटातून - २, आमदार अपूर्व प्रशांत हिरे - सोसायटी गटातून - २, केशव केरू भोर - सोसायटी गट - १, सुखाबाई देवराम फसाळे - ग्रामपंचायत गट - १, विलास निवृत्ती कांडेकर - सोसायटी गट - २, सोमनाथ गणपत बेंडकोळी - ग्रामपंचायत गट - १, किसन रामभाऊ हिंगमिरे - सोसायटी गट - २, शरद पांडुरंग पाळदे - ग्रामपंचायत गट - १, शरद काशीनाथ कड - ग्रामपंचायत गट - १ व जयवंतराव गणपतराव कोशिरे - सोसायटी गट - २ अशा एकूण २१ अर्जांची विक्री करण्यात आली. अर्ज दाखल करण्यांमध्ये यशवंत फकिरा ढिकले (सोसायटी गट), शिवराम दगू दोबाडे (ग्रामपंचायत गट), नितीन किसन जाधव (हमाल व्यापारी गट), राजेंद्र जनार्दन पवार (हमाल व व्यापारी गट) व भाऊसाहेब वाराजी ढिकले (सोसायटी गट) आदि पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Sales of 218 applications for market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.