इंटेक्सच्या नावाने बनावट बॅटऱ्यांची विक्री

By admin | Published: October 6, 2016 01:04 AM2016-10-06T01:04:43+5:302016-10-06T01:05:04+5:30

इंटेक्सच्या नावाने बनावट बॅटऱ्यांची विक्री

Sales of fake batteries in the name of Intex | इंटेक्सच्या नावाने बनावट बॅटऱ्यांची विक्री

इंटेक्सच्या नावाने बनावट बॅटऱ्यांची विक्री

Next

नाशिक : इंटेक्स कंपनीच्या नावाने बनावट मोबाइल बॅटरी व साहित्याची विक्री करणाऱ्या महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्कमधील चार मोबाइल विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
एमजी रोडवरील मोबाइल साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये इंटेक्स कंपनीच्या बनावट साहित्याची विक्री केली जात असल्याची माहिती कोल्हापूर येथील फिनिक्स कॉपीराइट प्रोटेक्शन कंपनीत तपासणी अधिकारी असलेल्या मयूर राजेंद्र धुमाळ (रा़ कोल्हापूर) यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी मित्र निखिल पाटीलसोबत या दुकानांमध्ये जाऊन इंटेक्सची बॅटरी खरेदी केली असता ती बनावट असल्याचे आढळून आले़ यानंतर मयूर धुमाळ यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार करून तेथील पोलिसांसमवेत एमजी रोडवरील भरत मोबाइल, मोबाइल स्पेअर पाटर््स, सागर मोबाइल व जय अंबे मोबाइल या दुकानांवर छापा मारला.

Web Title: Sales of fake batteries in the name of Intex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.