शाळांमधून माहिती पुस्तिकांची विक्री

By admin | Published: June 4, 2017 02:40 AM2017-06-04T02:40:51+5:302017-06-04T02:41:54+5:30

नाशिक : शहरातील विविध ५७ कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुमारे २४ हजार ५५५ जागांसाठी शुक्रवारी (दि.२) जून प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरू झाली

Sales of information books in schools | शाळांमधून माहिती पुस्तिकांची विक्री

शाळांमधून माहिती पुस्तिकांची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील विविध ५७ कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुमारे २४ हजार ५५५ जागांसाठी शुक्रवारी (दि.२) जून प्रवेशप्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून, शहरातील विविध शाळांमधून १६ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. त्यापैकी ५०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जातील भाग १ मधील माहिती पूर्ण करून ती आॅनलाइन प्रक्रियेसाठी दाखल केली आहे.
अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने या वर्षापासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू केली असून, या प्रक्रियेमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाशिक शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली त्या दिवसापासूनच बुधवारी (दि.३१) माहिती पुस्तिका खरेदी करण्यास सुरुवात केली होती. त्यापैकी अनेकांनी पहिल्याच दिवशी आॅनलाइन प्रवेश अर्जातील भाग १ भरून मुख्याध्यापकांकडून त्यांची पडताळणी करून घेत संकेतस्थळावर सादर केले आहे. आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेसोबतच शहरातील विविध मार्गदर्शन केंद्रही कार्यान्वित झाले असून, अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी आॅनलाइन प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून, संध्याकाळपर्यंत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. आॅनलाइन प्रवेशप्र्रक्रियेसाठी शहरात केटीएटएम महाविद्यालयात मुख्य केंद्र सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शहरात विविध ठिकाणी मादर्शन केंद्रही सुरू करण्यात आले आहेत.
या केंद्रांची रचना झोननुसार करण्यात आली आहे. या मार्गदर्शन केंद्राची सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांसाठी नाशिकरोडचे बिटको महाविद्यालय व नाशिक शहरातील बीवायके महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर विद्यार्थिनींसाठी व गृहविज्ञान शाखा अभ्यासक्रमासाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कें द्र सुरू करण्यात आले आहे, तर हिंदी माध्यमांच्या संयुक्त शाखांसाठी हिंदी माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Sales of information books in schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.