सलून व्यावसयिक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:24+5:302021-05-24T04:13:24+5:30
वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदेालन नाशिक : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन कर्मचारी जाहीर करण्यात यावे ...
वीज कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदेालन
नाशिक : वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन कर्मचारी जाहीर करण्यात यावे तसेच मेडिक्लेम योजनेतील टीपीएला तत्काळ बदलण्यात यावे, या मागणीसाठी वीज कर्मचारी सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. वीज कामगार व अभियंता संघटनेच्या कृती समितीने याबाबतचे पत्रक जाहीर केले आहे.
शहरात पावसाळापूर्व कामांना सुरूवात
नाशिक : पावसाळा सुरू हेाण्यापूर्वी महापालिकेच्यावतीने करण्यात येणारी पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू करण्यात आली आहेत. अनेक प्रभागांतील कामे पूर्णत्वास आली आहेत तर काही प्रभागांमधील कामांना सुरूवात झालेली आहे. तसेच तुंबणाऱ्या नाल्यांची दुरुस्ती व पाणी साठणाऱ्या चौकांमधील नाले दुरूस्तीला प्रारंभ करण्यात आला आहे.
सातपूरला महाविरणची कामे सुरू
नाशिक : विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सातपूर परिसरात सुरू झाले आहे. पावसाळ्यात झाडांच्या फांद्यांमुळे वीजपुरवठा विस्कळीत होत असल्याने वीज पुरवठ्यात खंड निर्माण होत होता. त्यामुळे अशा धोकादायक स्थितीतील झाडांच्या फांद्या छाटण्यात येत असून, रस्त्यावर पडलेल्या फांद्या त्वरित उचलून नेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वीजबिलांची तक्रार अजूनही कायम
नाशिक : नागरिकांना पाठविण्यात येणाऱ्या वीजबिलांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. सरासरी वीजबिलांची आकारणी करताना सांगितलेल्या कारणांवरून ग्राहक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. अनेकांनी ग्राहक मंचाकडे याबाबतची तक्रारही केली आहे. वीजबिलांचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना जादा दराने बिले दिली जात असल्याचा नागरिकांचा आरोप कायम आहे.
रिक्षाचालकांना अर्ज करण्याचे आवाहन
नाशिक : परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रूपयांची आर्थिक मदत राज्य शासनाने जाहीर केली होती. या मदतीसाठी रिक्षाचालकांनी अर्ज करावेत, यासाठी आता आवाहन करण्यात आले आहे. यासाठी रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ‘महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन ॲटोरिक्षा फायनान्सिअल असिस्टंट स्कीम’ या लिंकवर अर्ज करता येणार आहे.
जादा बिलांबाबतच अनेक तक्रारी
नाशिक : कोविड रूग्णांवरील उपचारासाठी संबंधित रूग्णालयांनी जादा बिलांची आकारणी केल्याच्या अनेक तक्रारी समेार येत आहेत. शहरातील दोन रूग्णालयांवर याबाबतची कारवाई करण्यात आल्यानंतर आता महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. रूग्णालयांच्या तक्रारींबाबत अनेक नागरिक पुढे येत आहेत.