सलून चालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:30 PM2020-06-10T21:30:38+5:302020-06-11T00:59:09+5:30

नाशिक : कोरोनामुळे घोषित केलेला लॉकडाऊन आता शिथिल केल्यानंतरही सलून व्यावसायिकांना संसर्गाच्या भीतीमुळे दुकाने उघडण्यास मनाई केली जात आहे. एकीकडे दळणवळणासह अन्य व्यावसायांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली जात असताना सलून व्यवसायावर मात्र निर्बंध आणले जात आहेत.

Salon driver aggressive | सलून चालक आक्रमक

सलून चालक आक्रमक

Next

नाशिक : कोरोनामुळे घोषित केलेला लॉकडाऊन आता शिथिल केल्यानंतरही सलून व्यावसायिकांना संसर्गाच्या भीतीमुळे दुकाने उघडण्यास मनाई केली जात आहे. एकीकडे दळणवळणासह अन्य व्यावसायांना दुकाने खुली करण्याची परवानगी दिली जात असताना सलून व्यवसायावर मात्र निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सलून व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असल्याने बुधवारी (दि. १०) नाभिक समाज महामंडळाच्या वतीने जिल्हाभर ठिकठिकाणी सलून चालकांनी आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला. इतरांना परवानगी, मग आम्हाला का नाही, असा सवाल करत सलून चालकांनी आक्रमक होत कुठे काळ्या फिती लावून तर कुठे अर्धनग्न आंदोलन करत शासनाचे आपल्याकडे लक्ष वेधले.
जिल्ह्यातील लासलगाव, निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर याठिकाणी सलून चालकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या तसेच दंडाला काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मालेगावी मूक निदर्शने
मालेगाव : शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या मालेगाव नाभिक समाज संघटनेने तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन केले.
मालेगाव नाभिक समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे व अतुल आहिरे यांचे आदेशानुसार मालेगाव शहर नाभिक संघातर्फे डीके कॉर्नर सोयगाव येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने नाभिक दुकानदार व कारागीर यांना लॉकडाऊनदरम्यान दरमहा १० हजार रुपये मदत द्यावी, या मागण्यांसाठी मूक आंदोलन केले. यावेळी दुकानदार बांधव हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी होते. याप्रसंगी शहर अध्यक्ष दिनेश सोनवणे, अतुल आहिरे, तात्या निकम, बंटी महाले, दिनेश सोनवणे, सागर सैंदाणे, विलास सैंदाणे, योगेश वाघ, किशोर सैंदाणे, रवि आहिरे, विशाल पगारे आदी दुकानदार उपस्थित होते.
-------------------------
सिन्नर : काळ्या फिती लावत निषेध
सिन्नर : अडचणीत सापडलेल्या सलून व्यावसायिकांना दरमहा १० हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाने करत काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला. सिन्नर शहरासह वावी, नांदूरशिंगोटे, पांगरी, ठाणगाव, वडांगळी या गावांसह आंदोलन करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, प्रांत अध्यक्ष दत्तात्रय अनारसे, जिल्हा अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष केशव बिडवे, जिल्हा संघटक रमेश बिडवे, तालुकाध्यक्ष महिंद्र कानडी, नाभिक युवा सेना अध्यक्ष वाल्मीक शिंदे, गोपीनाथ क्षीरसागर, गणेश कदम, वाळीबा जाधव, सुदर्शन कदम, संजय सोनवणे, अशोक सोनवणे, विलास चौधरी, भगवान संत, संदीप व्यवहारे, माधवराव शिंदे आदींसह नाभिक बांधव निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Salon driver aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक