सलून व्यावसायिकांनी वाढविले दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:39 AM2017-09-25T00:39:09+5:302017-09-25T00:39:17+5:30
वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे सर्व प्रकाराची शेव्हिंग उत्पादने व अन्य वस्तूंवर कर लावण्यात आल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे तसेच जीएसटी कायद्यामुळे २८ टक्के कर वाढीने सर्व प्रकाराच्या शेव्हिंग उत्पादने, हेअर कलर आणि इतर कॉस्मेटिक्स वस्तू महागल्या आहेत. साहजिकच सलूून व्यावसायिकांना दोन महिन्यांपासून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दाढी-कटिंगसह सर्व सेवामध्ये सलून व्यावसायिकांनी वाढ केली आहे.
नाशिक : वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे सर्व प्रकाराची शेव्हिंग उत्पादने व अन्य वस्तूंवर कर लावण्यात आल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे तसेच जीएसटी कायद्यामुळे २८ टक्के कर वाढीने सर्व प्रकाराच्या शेव्हिंग उत्पादने, हेअर कलर आणि इतर कॉस्मेटिक्स वस्तू महागल्या आहेत. साहजिकच सलूून व्यावसायिकांना दोन महिन्यांपासून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे दाढी-कटिंगसह सर्व सेवामध्ये सलून व्यावसायिकांनी वाढ केली आहे. पुढील आठवड्यात म्हणजे दि. १ आॅक्टोबरपासून सदर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. सलून दुकानदार चालक-मालक संघटना, सिडको, इंदिरानगर, पाथर्डी परिसरातील नाशिक समाज बहुद्देशीय संस्थांच्या या दोन्ही संघटनांची बैठक संत सेना भवन, सिडको येथे पार पडली. सदर बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. याअगोदर तीन वर्षांपूर्वी दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता महागाईमुळे पुन्हा दरवाढ करावी लागत आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.
या बैठकीला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक ईशी, सोमनाथ शिंदे, अमित कळंबे, गोकुळ पवार, मोहन अहिरे, भरत सोनवणे, सुरेश चित्ते, योगेश सैंदाणे, सतिश भराडे, आबा जाधव, गोरखनाथ हिरे आदी उपस्थित होते.