पांगरी येथे कोरोना वॉरिर्यसना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:02 PM2020-06-09T21:02:28+5:302020-06-10T00:14:46+5:30

सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे मुंबईहून आलेले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना वॉरियर्सने चौदा दिवस अपार कष्ट घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे पांगरी गाव कोरोना मुक्त झाले.

Salute to Corona Warriors at Pangri | पांगरी येथे कोरोना वॉरिर्यसना सलाम

पांगरी येथे कोरोना वॉरिर्यसना सलाम

googlenewsNext

सिन्नर : तालुक्यातील पांगरी येथे मुंबईहून आलेले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना वॉरियर्सने चौदा दिवस अपार कष्ट घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळविले. त्यामुळे पांगरी गाव कोरोना मुक्त झाले.
छावा मराठा संघटनचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी वावी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पांगरी उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, अशावर्क, नर्स यांचे मास,सॅनिटायझर देऊन आभार व्यक्त करत त्यांच्या कार्याला सलाम केला.
यावेळी पांगरी आरोग्य केंद्र अधिकारी श्रीमती.सायली मेंदगे, आरोग्य सेवक एस.वाय.कोकाटे, आरोग्य सेविका श्रीमती. एस. बी.दळवी, गट प्रवर्तक श्रीमती.आशा शेळके, हेमलता बोरसे, सुनैना चव्हाण, सविता निकम, स्मिता निकम, मंजुषा पांगारकर, सोनाली चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती रमेशआप्पा पांगारकर, भाऊसाहेब बैरागी,
माजी सरपंच शंकर पगार, संपत पगार, समाधान पांगारकर, रावसाहेब कांडेकर आदींसह गावकरी उपस्थित होते.

Web Title: Salute to Corona Warriors at Pangri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक