जुगलबंदीतून गुरूंना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:39+5:302021-07-31T04:14:39+5:30

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ग्लोबल व्हीजन शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना भारतीय अभिजात कलेची ओळख व्हावी यासाठी या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात ...

Salute to the Guru from Jugalbandi | जुगलबंदीतून गुरूंना वंदन

जुगलबंदीतून गुरूंना वंदन

Next

गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ग्लोबल व्हीजन शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना भारतीय अभिजात कलेची ओळख व्हावी यासाठी या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या जुगलबंदीमध्ये त्यांनी सुरुवातीला राग रागेश्रीमधील मध्यलयीतील तीनतालातील बंदिश 'आयो अतमत वारो सावरो' त्यानंतर दृतलयीतील बंदिश 'कैसे मनाऊ तोहे बालमुवा' , मग बडे गुलाम अली यांची पहाडी रागातील गाजलेली ठुमरी 'बलमा कदर नही जाने' आणि कार्यक्रमात शेवटी पं. शंकरराव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेली गवळण ‘भुलविले वेणू नादे’ सादर केली. हे दोन्ही युवक पं. शंकरराव वैरागकर यांचे शिष्य आहेत. त्यांना संगीत कुलकर्णी (तबला), संस्कार जानोरकर (हार्मोनियम), हितेश्वर पाटील (टाळ), कैलास काळे (साऊंड) यांनी साथसंगत केली. प्रारंभी एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी प्रस्तावना केली. शाळेचे टेक्निकल हेड मेहराज शेख व सहाय्यक सुशील सोनवणे यांनी संयोजन केले.

छायाचित्र आर फोटोवर ३० ग्लाेबल...

ग्लोबल व्हीजन स्कूलच्या वतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित सांगीतिक मैफलीत गाताना सागर कुलकर्णी व अथर्व वैरागकर.

300721\30nsk_10_30072021_13.jpg

 ग्लोबल व्हीजन स्कूलच्या वतीने गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित सांगितीक मैफलीत गाताना सागर कुलकर्णी व अथर्व वैरागकर.

Web Title: Salute to the Guru from Jugalbandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.