सिटू भवन येथे शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:45 AM2019-03-25T00:45:49+5:302019-03-25T00:46:11+5:30
नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
सातपूर : नाशिक जिल्हा वर्कर्स युनियन, सिटू आणि माकप यांच्या संयुक्त विद्यमाने सिटू भवन येथे शहीद दिनानिमित्त शहीद मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सिटूचे राज्य उपाध्यक्ष अॅड. आर. एस. पांडे, अॅड. तानाजी जायभावे, श्रीधर देशपांडे, सिटू जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, संतोष कुलकर्णी, अॅड. भूषण साताळे, कल्पना शिंदे, शहीद भगतसिंग युवा मंचचे नितीन सांगळे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सीताराम ठोंबरे होते.
यावेळी संजय पवार, तुकाराम सोनजे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी यांनी केले.
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव यांना क्रांतिकारी घोषणांची सलामी देण्यात आली. यावेळी डॉ़ कराड म्हणाले, शहीद भगतसिंग यांना अपेक्षित असलेला समाजवाद निर्माण करण्यासाठी देशात धर्मभेद, जातीभेद व्यवस्था मोडली पाहिजे आणि समाजवादी व्यवस्था निर्माण करून देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाला न्याय देणारी राज्यव्यवस्था निर्माण झाली पाहिजे.