सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

By admin | Published: January 4, 2017 12:05 AM2017-01-04T00:05:29+5:302017-01-04T00:05:42+5:30

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

Salute Savitribai Phule's work to Google! | सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला ‘गुगल’चा सलाम!

Next

नाशिक : भारताच्या पहिल्या महिला मुख्याध्यापक, ज्येष्ठ समाजसुधारक व महिला कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या १८६व्या जयंतीनिमित्त जागतिक स्तरावरील ‘गुगल’ या सर्च इंजिनने सावित्रीबाई फुले यांचे आकर्षक ‘डुडल’ साकारून त्यांना अभिवादन केले.
महिलांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी (दि.३) सर्वत्र साजरी करण्यात आली. सावित्रीबाई यांचा जन्म राज्यातील सातारा जिल्ह्यामधील नायगावमध्ये १८३१ साली झाला होता. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी इंग्रज राजवटीमध्ये लढा देत स्त्रियांना न्याय मिळवून दिला. १८४८ सालात त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली. यावेळी फातिमा शेख या एकमेव महिलेने शिक्षकाची जबाबदारी स्वीकारून सावित्रीबाई यांना मोलाची साथ दिली होती. महिलांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी सावित्रीबार्इंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून तब्बल १७ शाळा उघडल्या. सतीप्रथा, बालविवाह, विधवाविवाह निषेध अशा अन्यायकारक रुढींविरुद्ध एल्गार पुकारत महिलांना त्यामधून मुक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणामधील अभूतपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण केले. या प्रमुख माहितीसह सावित्रीबाई यांच्या संपूर्ण जीवनकार्यावरही ‘गुगल’ने प्रकाश टाकला आहे. ‘डुडल’वर क्लिक करताच सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती जगभर ‘गुगल’वरून उपलब्ध होत होती.

 

Web Title: Salute Savitribai Phule's work to Google!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.