सिन्नरसह तालुक्यात महिलांच्या सेवाकार्याला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:09+5:302021-03-09T04:17:09+5:30
एस. जी. प्राथमिक शाळा सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. ऑनलाइन ...
एस. जी. प्राथमिक शाळा
सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूलच्या प्राथमिक विभागात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमात सूर्यभान गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून स्वाती गडाख होत्या. याप्रसंगी सचिव राजेश गडाख, मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे आदींसह पालक उपस्थित होते. यावेळी जीजा ताडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन जयश्री सोनजे, पद्मा गडाख, जीजा ताडगे, वृषाली जाधव यांनी केले होते. मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जयश्री सोनजे यांनी केले. पद्मा गडाख यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------
बारागाव पिंपरी विद्यालय
बारागाव पिंपरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अशोक बागुल यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणासाठी विविध कायदे असून, महिलांनी हे कायदे समजून घेऊन सर्वच स्तरातील महिलांना सक्षम बनवावे, असे प्रतिपादन अशोक बागुल यांनी केले. यावेळी उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षक दशरथ सारस, भाऊराव गुंजाळ, निर्गस बानू शेख, योगिता फडोळ, दीपमाला पगारे, सुनीता आव्हाड आदी उपस्थित होते. सलीम शेख यांनी सूत्रसंचालन केले.
-----------------------------------------------
उपजिल्हा रुग्णालय
सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, दापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. वर्षा लहाडे, डॉ. निर्मला पवार (गायकवाड), तसेच आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण उपजिल्हा रुणालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. निर्मला पवार - गायकवाड यांना कोविडयोद्धा म्हणून आर. बी. फाऊंडेशनच्या वतीने गौरविण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्य सिमंतिनी कोकाटे, दापूरच्या आर. बी. फाऊंडेशने अध्यक्ष योगेश आव्हाड, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, पंकज जाधव, प्रशांत सोनवणे, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाड उपस्थित होते.
फोटो - ०८ सिन्नर महिला दिन
सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनीता गडाख, स्वाती गडाख, राजेश गडाख, उदय कुदळे, जयश्री सोनजे, पद्मा गडाख, जीजा ताडगे, वृषाली जाधव आदी उपस्थित होते.
===Photopath===
080321\08nsk_52_08032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०८ सिन्नर महिला दिन सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनिता गडाख, स्वाती गडाख, राजेश गडाख, उदय कुदळे, जयश्री सोनजे, पद्मा गडाख, जिजा ताडगे, वृषाली जाधव आदि.