मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:53 PM2017-09-02T12:53:05+5:302017-09-02T13:17:15+5:30

शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले.

Samajik Namaz Text of Muslim Brothers | मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण

मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण

Next
ठळक मुद्दे ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमनशहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठण पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध मैदानात जमले ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये.

नाशिक : शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. दरम्यान, धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. त्यांनी ‘बकरी ईद व इस्लाम’ या विषयावर प्रकाश टाकला. सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्यावर असलेले पावसाचे सावट दुरू झाले. प्रवचनानंतर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला सुरूवात झाली. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध यावेळी मैदानात जमले होते. तत्पूर्वी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारालगत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेल्या नळांवरून समाजबांधव शुचिर्भूत (वजू) झाले.

इदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थिताना ईद व इदगाहचे महत्त्व पटवून सांगत ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये, असे आवाहन केले. सव्वा दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थिताना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात झाली. उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज उत्साहात अदा केली

विश्वशांतीसाठी प्रार्थना
सर्व मानवजातीसह भारत आणि विश्वाच्या कल्याणासाठी दुआ नमाजपठणानंतर खतीब यांनी विशेष दुआ केली. समाजातील सर्वच घटकांच्या विकासाबाबत खतीब यांनी दुआ मागितली. उपस्थितांनी त्यांच्या प्रार्थनेला ‘आमीन’ शब्द उच्चारत प्रतिसाद दिला. दरम्यान, भारतावर वक्रदृष्टी करणाºया दहशतवादी संघटना नेस्तनाबूत व्हाव्या आणि देशात अमन व शांती कायम नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. सर्वांनी उभे राहुन प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामुहिक पठण केले. नमाजपठणाचा सोहळ्याचा समारोप उत्साहात व शांततेत झाला.

Web Title: Samajik Namaz Text of Muslim Brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.