समता परिषदेचे मोर्चे, आंदोलने स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:41 AM2020-12-17T04:41:35+5:302020-12-17T04:41:35+5:30
यासंदर्भात समता परिषदेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत ...
यासंदर्भात समता परिषदेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत भूमिका घेतली आहे. त्यामुळे या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये याबाबत राज्यभर रस्त्यावरचे मोर्चे व आंदोलने करून आपली भूमिका शासनाकडे मांडली आहे. मात्र हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाने मराठा आरक्षण देताना ओबीसींसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दि १८ डिसेंबरला औरंगाबादला असलेला आभार मोर्चा होईल त्यानंतर विविध जिल्ह्यात नियोजित असलेले मोर्चे व रस्त्यावरचे आंदोलने थांबविण्यात येत आहे. केवळ ओबीसी आरक्षणासाठी शासनाने निष्णात वकील देणे आणि महाज्योती, शिष्यवृत्ती यासह इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समता परिषदेचे पदाधिकारी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, शिवाजीराव नलावडे, बाळासाहेब कर्डक, ॲड. सुभाष राऊत यांनी म्हटले आहे.